breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय वादातून माझ्या पतीला गोवले – नगरसेविका गीता मंचरकर

पिंपरी –  हिंदुस्थान अॅंन्टिबाॅयोटिक्स उपहार गृहाशेजारी अज्ञाताकडून महिलेवरील गोळीबार झाला. त्या प्रकरणात अॅड. सुशील मंचरकर यांना राजकीय वादातून गोवले आहे. फिर्यादी महिला जाणीवपूर्वक माझ्या पतीच्या विरोधात खोट्या तक्रारी करीत असून संबंधित महिलेला विरोधकांचे पाठबळ आहे, असा आरोप नगरसेविका गीता मंचरकर यांनी केला आहे.

महापालिका विरोधी पक्षनेतेच्या दालनात आज (सोमवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित होते. पिंपरी, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी वसाहतीमध्ये एका महिलेवर शनिवार (दि.9) अज्ञातांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी  अॅड. सुशील मंचरकर यांना शुक्रवारी (दि.15) सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे.

मंचरकर म्हणाल्या की, माझ्या प्रभागातील राजकीय विरोधकांनी आपले जगणे मुश्‍किल केले आहे. प्रभागातील नागरिकांशी संवाद साधायला गेल्यानंतर विरोधक व त्यांचे साथीदार पाळत ठेवतात. अनेक खुनाच्या खटल्यात आरोपी असलेले विरोधक पोलिसांना हाताशी धरुन खोट्या पुराव्याच्या आधारे पती अॅड. सुशील मंचरकर यांना गुन्ह्यांमध्ये गोवले जात आहे. आपल्या दोन मुलींनाही त्यांच्यामार्फत गुंडांकडून त्रास दिला जात आहे. सतत दहशत, धमक्‍या, पाळत ठेवून आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा, आरोपही त्यांनी केला. याबाबत  त्या महिलेचा आमचा काही संबंध नाही. गोळीबार झालेल्या दिवशी पती माझ्यासोबत होते. त्यामुळे गोळीबार प्रकरणात त्यांचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे आमचे कुटुंब विरोधकांच्या दहशतीखाली वावरत असून त्यांना पोलिस पाठबळ देत असल्याने आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही,  तसेच याबाबत मुख्यमंत्री, राज्य महिला आयोग, मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी योग्य तपास करुन ‘दूध का दूध पाणी का पाणी’ करावे. असेही त्या म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button