गेवराईतील महानुभव आश्रमात 29 जणांना कोरोनाची लागण
बीड- गेवराई तालुक्यातील येवले वस्ती येथील महानुभव आश्रमात तब्बल 29 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून दुसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने चाचण्यांत वाढ केली आहे.
बीड जिल्ह्याच्या गेवराई जवळच्या कोल्हेर येवले वस्तीवरील महानुभाव पंथाच्या आश्रमात 25 फेब्रुवारीला धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शेकडो साधकांनी हजेरी लावली होती. आश्रमात राहणार्या साधकांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे आश्रमातील 60 साधकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात 29 जण पॉझिटिव्ह आढळले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आश्रमात सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनेनंतर तहसीलदार आणि तालुका अधिकार्यांनी आश्रमाला भेट देऊन धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या साधकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचार्यांना दिल्या आहेत.