breaking-newsपश्चिम महाराष्ट्र

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी गणरायाचे थाटात आगमन

सातारा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज गणरायाचे आगमन होत आहे. साताऱ्यातही कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा केला जात आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी आज गणरायाचे मोठ्या थाटात आगमन झाले. यावेळी संबळ, तुतारी आणि ताश्यांच्या गजरात मानाच्या पालखीमधून गणरायाचे आगमन करण्यात आले. राज्यावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे अस साकडं गणरायाचरणी यावेळी घालण्यात आले. शंभूराज देसाई यांनी गणेशभक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.

दरम्यान राज्यभरात आज गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने यंदाचा उत्सव हा घरातच राहून साजरा करा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले असून, या निर्णयाचा जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button