breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गृहप्रकल्पाची जागा ताब्यात नसताना महापालिकेने काढली निविदा – नगरसेविका खानोलकर यांचा आरोप

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या प्रकल्पांच्या रावेत येथील गृहप्रकल्पाची जागा ताब्यात नसताना महापालिकेने निविदा काढली आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी उपस्थित केला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील 10 ठिकाणी नऊ हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. च-होली येथे एक हजार 442 सदनिका बांधण्यासाठी 132 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. तर, रावेत येथील 934 सदनिका बांधण्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रस्तावाला फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीने मान्यता देखील दिली आहे. परंतु, रावेत येथील प्रकल्पाच्या जागेचा ताबा अजूनही पालिकेकडे नाही. तसेच दोन प्रकल्पाच्या निविदांना मंजुरी दिल्यानंतर पालिकेने आता पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकाम परवानगीकरिता पर्यावरण दाखला अशा विविध परवानग्या मिळविण्यासाठी स्वंतत्र पर्यावरण सल्लागार नेमला आहे. या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूरी दिली.

त्यानंतर पत्रकार परिषेद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ” पंतप्रधान आवास योजनेतून गोरगरीब नागरिकांना घरे मिळणार असून हा प्रकल्प चांगला आहे. या प्रकल्पाला पक्षाचा आणि माझा विरोध नाही. परंतु, पालिका राबवित असलेल्या चुकीच्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. दोन महिन्यांपूर्वी च-होली आणि रावेत येथील गृहप्रकल्पाला मंजुरी दिली आहे. रावेत येथील गृहप्रकल्पाची जागा पालिकेच्या ताब्यात देखील नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने जागेचा ताबा अद्यापर्यंत दिला नाही. तरीदेखील निविदा काढण्याची घाई का केली असा विचारले असता कामाचा कार्यात आदेश दिला नसल्याचे उत्तर अधिका-यांनी दिले आहे. मग, जागा ताब्यात नसताना दोन महिन्यांपूर्वी निविदा मंजूर करण्याची घाई कशासाठी केली, असा सवालही खानोलकर यांनी उपस्थित केला आहे. आता आवास योजनेसाठी विविध परवानग्या घेण्यासाठी स्वतंत्र पर्यावरण सल्लागार नेमण्यात आला आहे. निविदा मंजूर करण्याच्या अगोदरच सल्लागार नेमणे गरजेचे होते. याबाबत प्रशासनाला विचारले असता सल्लागाराचा दर आता परवडला म्हणून नेमल्याचे उत्तर अधिका-यांनी दिले आहे, असेही खानोलकर त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button