breaking-newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडी

गूगल-फेसबुकसह अमेरिकन टेक कंपन्यांनी भारतात आतापर्यंत केली 1.27 लाख कोटींची गुंतवणूक

2020 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांची भारतात गुंतवणूक करण्याची चढाओढ लागली आहे. या कंपन्यांनी जानेवारीपासून 15 जुलैपर्यंत भारतात 17 अब्ज डॉलर (1.27 लाख कोटी रुपये)ची गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांमध्ये अॅमेझॉन, फेसबुक आणि गूगलसारख्या कंपन्या सामील आहेत.

अमेरिकेतील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने जानेवारीमध्ये 1 अब्ज डॉलर (7400 कोटी रुपये)च्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. यानंतर फेसबुकने एप्रिलमध्ये 6 अब्ज डॉलर (44 हजार कोटी रुपये) च्या गुंतवणुकीची घोषणा केली. यानंतर गूगलने मागच्या आठवड्यात, 15 जुलैला 10 अब्ज डॉलर (75 हजार कोटी रुपये) गुंतवण्याची घोषणा केली. भारतात होत असलेली गुंतवणूक एका रात्रीत झाली नाही. काही महिन्यांपूर्वीपर्यंत अमेरिकन टेक कंपन्यांचा भारतीय रेगुलेटर्ससोबत वाद सुरू होता आणि त्यांच्या सीईओला दिल्लीला यावे लागले होते. पण, तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती बदलली आहे. कोरोना व्हायरसमुळे जगाची अर्थव्यवस्था मंदावली आहे, भारतालाही याचा फटका बसला आहे.

याशिवाय टेक क्षेत्राबाबत भारत आणि चीनमधील तनाव वाढला आहे. भारतासोबत येत अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही चीनी अॅप्सवर अविश्वास दर्शवला आङे. अखेर चीन आणि हॉन्गकॉन्गकडून मिळत असलेल्या आव्हांनांचा सामना करण्यासाठी अमेरिकन टेक कंपन्यांसाठी भारत पहिली पसंत बनला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button