breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात; जाणून घ्या मुहूर्त व पूजाविधी

 

मुंबई – चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणे वर्षातून दोन वेळा गुप्त नवरात्री  येते. पहिली माघच्या महिन्यात येते आणि दुसरी आषाढ महिन्यात येते. माघ महिन्याची गुप्त नवरात्री आज 12 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. गुप्त नवरात्री विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठीची नवरात्री असते. यामध्ये भगवती कालीच्या स्वरुपासोबत दहा महाविद्यांची पूजा केली जाते.

गुप्त नवरात्रीत माता कालिका, तारा देवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, माता चित्रमस्ता, त्रिपुर भैरवी, माता धूम्रवती, माता बगलामुखी, मातंगी, कमला देवी या दहा महाविद्यांची पूजा केली जाते. पूजेसाठी सर्वात आधी कलश स्थापन करून मग देवी दुर्गेची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करुन लाल रंगांचे कुंकू आणि सोनेरी गोटे असलेली ओढणी अर्पित करा. मग पूजास्थानाच्या उत्तर-पूर्व दिशेच्या जमिनीवर सात प्रकारचे धान्य, पवित्र नदीची वाळू आणि जव टाका. कलशात गंगाजल, लवंग, वेलची, पान, सुपारी, रोली, मौली, अक्षत, हळद, शिक्का आणि फुल टाका. आंब्याचे पान कलशावर सजवून ठेवा, वरुन जव किंवा तांदूळ वाटीत भरुन कलशाच्या वर ठेवा. त्यामध्ये नवीन लाल कपड्यात बांधून पाणी असलेलं नारळ डोक्याला लावून नमस्कार करा आणि कलश वाळूवर स्थापन करा. त्यानंतर नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावा. सोबतच देवीच्या विशेष मंत्र, पाठ याचं गुप्त रुपाने पठन करा. जास्तकरुन अघोरी आणि तांत्रिक गुप्त नवरात्रीदरम्यान मध्यरात्री देवीची पूजा करतात.

शुभ मुहूर्त

कलश स्थापनेची शुभ वेळ : सकाळी 8 वाजून 34 मिनिटं ते 9 वाजून 59 मिनिटांपर्यंत
अभिजीत मुहूर्त : दुपारी 12 वाजून 13 मिनिट ते 12 वाजून 58 मिनिटांपर्यंत
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button