breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गुण पडताळणी ‘अशी’ करता येणार

पुणे : राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना तो करता येणार आहे. त्यासाठी अर्जाचा आवश्‍यक नमुना संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो डाऊनलोड करुन स्वयंसाक्षांकित गुणपत्रिकेच्या प्रतिसह विद्यार्थ्यांनी 31 मे ते 9 जून या कालावधीत तो अर्ज व शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे सादर करायचा आहे.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी आधी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्‍यक आहे. छायाप्रतीसाठी 31 मे ते 9 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करुन घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांना जून ते ऑगस्ट व फेब्रुवारी ते मार्च 2019 अशा दोनच संधी उपलब्ध असतील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित वृत्त-

 

HSC Result 2018 Live Updates : यंदाही मुलींनीच मारली बाजी

HSC Result 2018 : निकाल पाहण्यासाठी ‘ही’ आहेत संकेतस्थळे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button