breaking-newsराष्ट्रिय

गुगलने डुडलच्या माध्यमातून संशोधक सोरेनसेन यांचा केला सन्मान

नवी दिल्ली : वेगवेगळ्या दिवशी खास डुडल तयार करून त्या-त्या दिवसाचे महत्त्व सांगण्याचे काम गुगल करते. त्यातच आज गुगलने संशोधक एसपीएल सोरेनसेन यांचा सन्मान करण्यासाठी खास डुडल तयार केले आहे.  सोरेनसेन हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी ‘ph scale’  जगासमोर मांडला. सोरेनसेन यांनी पदार्थांमधील आम्लता मोजण्याचे माप तयार केले ज्याचा प्रयोग आज देखील करण्यात येतो.

सोरेन पेडर लॉरीट्ज सोरेनसेन असे त्यांचे पूर्ण नाव आहे. सुरुवातीला त्यांची रुची औषधे तयार करण्यात होती. मात्र त्यानंतर त्यांची भेट संशोधक जोर्जेंसन यांच्या सोबत झाली.आणि जोर्जेंसन यांच्या कार्याला पाहून ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी रसायनशास्त्रत करियर करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी एक एक पल्ला गाठत आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपले नाव केले आणि आजही त्यांचे नाव तेवढ्याच सन्मानाने घेतले जाते. त्याच सन्मानाच्या पार्श्वभूमीवर आज गुगलने खास डूडल तयार केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button