breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम – मुख्यमंत्री

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक येण्याचे प्रमाण हे ४० टक्के आहे. येथील सोयी-सुविधा पाहता अनेक परदेशी उद्योजकांचीही महाराष्ट्रालाच पहिली पसंती मिळत आहे. प्रत्येक परदेशी शिष्टमंडळाने महाराष्ट्र हे गुंतवणुकीला सर्वोत्तम असल्याची पावती दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चीनच्या शिष्टमंडळाला दिली.

चीनमधील सिचुआन प्रांतातील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायची आहे, यासाठी शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी  शिष्टमंडळाला दिले.

फडणवीस म्हणाले, देशात परकीय गुंतवणुकीत राज्य अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारत आहे. यामुळे येत्या २०२५ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होणार आहे. आपण महाराष्ट्रात कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करू शकता, महाराष्ट्र शासन सहकार्य करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button