गवंडी, बांधकाम, मोलमजुरी करणा-या कामगारांना पगार द्यावा, मीना मोहिते यांची मागणी
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील गवंडी, सेट्रींग अशा मोलमजूर कामगारांनाही कामबंद परिस्थितीत पगार देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभाग पुणे जिल्हा अध्यक्षा मीना मोहिते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय काँलेज, राज्यातील या अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक वर्गाना सुटीचा पगार सुरू आहे. तसेच, एमआयडीसीत काम करणारे कर्मचारी, अधिकारी व कामगार यांना कपंनीचा मालकाना पगार देणार आहेत.
याबरोबरच राज्यातील गवंडी कामगार, सेट्रिंग कामगारांचे हतावरचे पोट आहे. यांना बिल्डर यांच्याकडून पगार देण्याच्या सुचना देण्यात याव्यात. तसेच, रोज मेलमजुरी करूण पोट भरणारे कामगार यांना शासनाने धान्य द्यावे, अशी मागणी मोहिते यांनी केली आहे.