ताज्या घडामोडीपुणे

गरजू खेळाडूंना खेळण्यासाठी शहरातील बंद असलेली मैदाने तातडीने सुरू करावेत – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी – शहरातील अनेक खेळाडू बॅडमिंटन खेळासाठी बॅडमिंटन हॉलची मागणी करत असून उपलब्ध हॉल कमी पडत असल्याने खेळाडूंची अडचण होत आहे. महापालिकेच्या स्व:मालकीचे असलेले थेरगाव येथील बॅडमिंटन हॉल व ‘काशिबाई शिंदे’ बॅडमिंटन हॉल, पिंपरी सद्दस्थितीत बंद अवस्थेत असून, गोडावून म्हणून त्याचा वापर होत असल्याचे समजते. शहरातील खेळाडूंच्या असलेल्या मागणीचा विचार  करता त्यांच्या सोयीकरता सदर हॉल सुरू करणे गरजेचे असल्याचे समजते. सध्या शाळा व महाविध्यालयांचा सुट्ट्यांचा कालावधी सुरू होत असल्याने प्रकर्षाने याची उणीव जाणवणार आहे. तरी, उक्त बॅडमिंटन हॉल खेळाडूंना खेळासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावेत. अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनास दिली आहे.   

आजची नवीन पिढी टीव्हीमोबाइल आणि कम्प्युटरमध्येच अडकून पडली आहे. त्यांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत असते. प्रत्यक्षात मात्र मुलांना खेळण्यासाठी मैदानेच नसल्यामुळे खेळायचे कुठेअसा प्रश्न त्यांना पडतो. आता काही खेळाडूंनी अश्या सूचना केल्या आहेत. पालिका प्रशासनाने सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरण निश्चित करावे आणि खेळाडूंना सरावासाठी मैदाने उपलब्ध करावीतअशी सूचना केली आहे.

अनेक प्रशिक्षक खेळाडूंना प्रशिक्षण देत असलेतरी या मैदानावर सरावासाठी लागणारी मातीमैदानावर पडलेले खड्डे बुजविणेया गोष्टींकडे पालिका प्रशासनाकडून लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमाच्या दरम्यान या मैदानावर खोदल्या जाणाऱ्या खड्ड्यांमुळे मैदानाची दुरवस्था होते. मात्र पालिका प्रशासनकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची खेळाडूंची तक्रार आहे.

पिंपरी चिंचवड खेळाडूंसाठी मर्यादित मैदानांची संख्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील मैदाने व बॅडमिंटन हॉल यांचीही नियमित देखभालदुरुस्ती होत नसल्यामुळे बंदिस्त क्रीडागृहात खेळाडूंना स्वच्छ्तागृह आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भरविण्यात येत नाहीत. मैदानात तरुणांना फुटबॉल आणि व्हॉलिबॉलचे सामने भरविले जात नाहीत. त्यामुळे बंद असलेले हॉल सुरू झाले तर खेळाडूंना खेळण्यासाठी हक्काचे मैदान आणि सुविधा उपलब्ध होऊ शकतील.

खेळात चमकदार कामगिरी करणारे खेळाडूसुद्धा प्रतिकूल परिस्थितीत खेळत अनेक पदके जिंकत आहेत. मात्र हे खेळ आणि खेळाडू दोन्ही दुर्लक्षितच राहत आहेत. जिम्नॅशियमकबड्डीखो-खोआट्यापाट्याफुटबॉलडॉजबॉलसायकल पोलोवेटलिफ्टिंगरस्सीखेचटेनिसव्हॉलिबॉलस्क्वाशलेग क्रिकेटलंगडीलेझिमरोप स्कीपिंगजम्प रोपकराटेपॉवर लिफ्टिंगयांसारख्या खेळात आजवर अनेक खेळाडू चमकले आहेत. खासगी क्लासद्वारे खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्यातरी सर्वसामान्य खेळाडूंना खासगी क्लासची फी परवडत नसल्यामुळे क्षमता असलेले गरीब खेळाडू मागेच पडतात.

या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनास बंद असलेली मैदाने सुरू करण्याची सुचना केली आहे. शहराचे नावलौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत पालिकेचे क्रीडा धोरण निश्चित करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची सूचना केली आहे. ज्यामुळे खेळ आणि खेळाडूंसाठी मैदानाचे वेळापत्रक ठरवता येईल आणि मैदानाचा इतर कार्यक्रमांसाठी केला जाणारा वापर टाळून खेळाडूंना पूर्ण वेळ मैदाने उपलब्ध होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button