breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने प्रभाग स्तरावर फिरत्या हौदाची सोय करावी – नाना काटे

 पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

गणेश विसर्जनासाठी प्रभाग स्तरावर फिरत्या हौदाची व्यवस्था करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.

यासंदर्भात काटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशभक्त मनोभावे गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतात. सध्या शहरात उत्सवाचे वातावरण आहे. परंतु, गणेश विसर्जनाबाबत प्रशासनाने नेहमीच्या शहरातील नदीकाठच्या घाटांवरील विसर्जनास कोरोनामुळे प्रतिबंध केला आहे. घरातच गणपती बसवा व घरातच विसर्जन करा, असे आवाहन केले आहे.

परंतु, हेच आवाहन गणपती येण्याच्या पाच दिवस अगोदर केले असते तर नागरीकांनी कमी उंचीच्या व प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्या न आणता शाडूच्या मूर्त्या आणल्या असत्या. परंतु, आता नागरीकांनी प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तींचे घरच्या घरी विसर्जन होणार नाही. कारण, त्या मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मुर्तींची विटंबना होईल व नागरीकांच्या भावना दुखावल्या जातील.

त्यामुळे पुढील पाच, सात आणि नऊ दिवस व अनंत चर्तुथी या विसर्जन दिवशी गणेश विसर्जनासाठी पुणे मनपाच्या धर्तीवर फिरत्या हौद उपलब्ध करावेत. मुर्ती विरघळण्यासाठी आवश्यक असणारी पावडरसुध्दा उपलब्ध करुन द्यावी. त्याचप्रमाणे शहरातील सामाजिक संस्था गणेश मुर्तीचे दान स्वीकारतात. त्यांना सुध्दा गणेश मुर्ती दान करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी निवेदनात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button