breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणराया पाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन

गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असेही संबोधले जाते. गौरींचे आगम झाल्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी वेध लागतात ते गौरी आमगनाचे. आज गौरींचे आगमन झाले असून घरोघरी सोशल डिस्टनसिंग पाळून गौराईचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्रात गणेशोत्सवात मंगलमूर्ती गणरायाची जितकी उत्सुकता असते तितकीच गौराईच्या रूपात येणार्‍या पार्वतीची असते. बाल गणेशाला घेऊन जाण्यासाठी आलेली गौराई गौरी आवाहनाच्या दिवशी येते, गौरी पुजनाच्या दिवशी विराजमान होते तर तिसर्‍या दिवशी विर्सजनाच्या वेळेस आपल्या घरी पुन्हा परतते. त्यामुळे गौराईच्या या सणाला माहेरवाशिणींचा सण देखील म्हटला जातो. या निमित्ताने घरातील लेकी-सुना एकत्र येऊन खेळ खेळतात. गौराईच्या पुजानानिमित्त रात्र जागवतात. नवविवहितेसाठी गौराईचा सण मोठा खास असतो. या दिवशी 5 ओवसं देऊन तीला घरातील ज्येष्ठांकडून आशिर्वाद मिळतात. दरम्यान या सणाच्या निमित्त हमाखास सुवासिनींना ओवसं देताना-घेताना नाव घेण्याचा आग्रह केला जातो. मग यंदा तुम्ही देखील गौरी पुजनाला घराबाहेर पडताना नावं घेण्यासाठी उखाण्यांची देखील तयारी करून बाहेर पडा.

दरम्यान महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाच्या काळात 25 ऑगस्ट दिवशी गौरी आवाहन आहे. म्हणजे प्रथेनुसार या दिवशी गौरी येईल रात्री तिची आकर्षक सजावट केली जाईल. तर दुसर्‍या दिवशी गौरी पुजनाच्या दिवशी ओवसं भरून विधिवत तिची पुजा करून रात्र जागवण्याचा कार्यक्रम केला जाईल.

महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तेरड्याच्या पानांची, खड्यांची, पीठाची प्रतिकात्मक गौरी आणून तिची पूजा करण्याची पद्धत आहे. तर आता मूर्तीच्या स्वरूपात देखील गौराई घरा-घरामध्ये विराजमान होतात. यामध्येही काहींकडे एकच मूर्ती असते. तर काही जण ज्येष्ठा- कनिष्ठा अशा दोन गौरी आणून तिचं पूजन करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button