breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गडचिरोली : नलक्षलवाद्यांकडून कमांडोंच्या ताफ्यावर भ्याड हल्ला, 15 जवान शहीद

गडचिरोली – महाराष्ट्र दिनीच दिवशीच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूळखेडा गावाजवळील ही घटना आहे. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बरोबरच जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीच्या चालकाचाही या भीषण हल्ल्यात मृत्यू झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वृत्ताला दुजोरा आहे. नक्षलवाद्यांकडून लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा आहे. हा हल्ला अत्यंत दुर्दैवी असून याचा निषेध करावा तेवढा कमीच अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

ANI

@ANI

Sudhir Mungantiwar, Maharashtra Minister on Gadchiroli naxal attack: We suspect that 15 police jawaans and a driver have lost their lives in this incident.

53 people are talking about this

-Ads-


दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा 


गडचिरोलीत 24 तासात नक्षलवाद्यांचा दुसरा हल्ला आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी काल रात्रीच धुमाकूळ घालत रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल 30 वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिली होती. नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेली वाहने जवळपास दहा ते 12 कोटी रुपयांची होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button