breaking-newsराष्ट्रिय

गँगस्टर रवी पुजारीची धमकीः उमर खालीद

नवी दिल्ली :  गँगस्टर रवी पुजारीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालीद याने केला आहे. या प्रकरणी खालीद याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गुजरातमधील दलित नेते आणि आमदार जिग्नेश मेवानी यांनीही रवी पुजारीने धमकी दिल्याचा आरोप केला होता.

गँगस्टर रवी पुजारीकडून धमकी येत असल्याची तक्रार उमर खालीदने शुक्रवारी केली. आम्ही या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आपण पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे, असं ट्विट उमर खालीदने केले आहे. पोलिसांना आपण सर्व माहिती दिली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये याच व्यक्तीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे खालीदने ट्विटमध्ये म्हटले आहे. भारत सोडायला सांगा अन्यथा तुमच्या मुलाला ठार मारू असा धमकीचा फोन आला होता, असं उमर खालीद याचे वडील सईद रसुल म्हणाले होते. त्यांनी या प्रकरणी २०१६मध्ये पोलिसात तक्रार केली होती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button