breaking-newsक्रिडा

खेळाडूंच्या मुलींची जमली गट्टी

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रेटिजच्या मुलांची चर्चा अनेकदा आपल्या कानावर येत असते. मात्र हल्ली यांच्यासोबत क्रिकेटरर्सच्या मुलांचीही चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने इन्स्टाग्रामवरुन लेकीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्‍यामध्ये धोनी आपल्‍या मुलीचे हेअर ड्राय करताना पाहायला मिळाले. धोनीनंतर आता रैना आणि हरभजन यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. यात या दोघांच्या मुलींसह चेन्नई सुपर किंजचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी अर्धात झिवा देखील दिसत आहे.

आयपीएलच्या अकराव्या हंगामात महेंद्रसींग धोनीच्या मुलीचा व्हिडिओ सतत व्हायरल होत असतो. या बाप-लेकी सारखे चर्चेत असतात. पण नुकताच सुरेश रैना आणि हरभजन सिंगने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओध्ये भज्जीचीमुलगी हिनाया, धोनी ची मुलगी झिवा आणि रैनाची मुलगी ज्रेसिया या एकत्र मिळून डान्स करत आहेत. एका संघातील खेळाडूंच्या मुलींनी एकत्र येऊन त्यांची जणू एक टिमच केली आहे, असे या व्हिडिओतून दिसते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button