breaking-newsराष्ट्रिय

खुशखबर…! आता उधारीवर मिळणार पेट्रोल-डिझेल

नवी दिल्ली : देशातील वाहन धारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण, पेट्रोल आणि डिझेल आता लवकरच उधारीवर खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे. यासाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट आणि हिंदूस्तान पेट्रोलियममध्ये करार झाला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना आता पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी कर्ज मिळणार आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट सध्या व्यावसायिक वापरासाठीची वाहने आणि टायर खरेदी करण्यासाठी लोन देते. पण आता पेट्रोल-डिझेलसाठीही लोन देणार आहे.

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीतर्फे कर्ज देण्याची सुविधा देण्यात येत आहे. हे कर्ज १५ ते ३० दिवसांमध्ये फेडावे लागणार आहे. या कर्जासाठी किती व्याज आकारण्यात येईल हे कंपनीने स्पष्ट केलेले नसले तरी कर्जावरील व्याज कमी असेल सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या खरेदीसाठी क्रेडिट किंवा तत्सम कार्डाचीही गरज नसून केवळ मोबाईल नंबरची जोडणी पुरेशी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पेट्रोल-डिझेलसाठी लोन घ्यायचे असल्यास ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपीच्या (वन टाइम पासवर्ड) मार्फत लोन देण्यात येईल. लोनवरचे पेट्रोल-डिझेल वापरल्यामुळे ग्राहकांना लॉयल्टी पॉईंट आणि विम्याची सुविधाही मिळणार असल्याचे हिंदूस्तान पेट्रोलियमने सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button