breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

खासदार नवनीत कौर राणा मास्क घालून संसदेत दाखल

नवी दिल्ली | चीनच्या बुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत सर्वत्र पसरली आहे. अनेक देशांना आपल्या विळख्यात घेणारा कोरोना आता आपल्या भारतातही दाखल झाला आहे. देशात आतापर्यंत 28 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. देशाच्या राजधानीत कोरोनाचे काही रुग्ण आढळल्याने तेथील नागरिक योग्य ती काळजी घेत आहेत.

यातच खासदार नवनीत कौर राणा आज(बुधवार) संसदेत मास्क घालुन आल्याचे दिसले. यादरम्यान त्यांच्या स्टाफनेही मास्क घातले हाते. दुसरीकडे, कोरोनामुळे दिल्लीतील 5 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीतील अरिवंद केजरीवाल सरकार 3.5 लाख एन 95 मास्कची व्यवस्था करत आहे.

जगासह भारतातही लोकांची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसपासून महाराष्ट्र अजुनही सुरक्षित असल्याचा दावा सरकार करत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button