पिंपरी / चिंचवड

क्रीडा विभागाचे राजेंद्र नागपुरे यांच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली नोटीस

पिंपरी – महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात जाणुनबुजून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी क्रीडा विभागातील ज्युनियर टेक्निशियन असिस्टंट राजेंद्र श्रावण नागपुरे यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागात राजेंद्र श्रावण नागपुरे ज्युनियर टेक्निशियन अँसिस्टंट म्हणून जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत. जलतरण तलावाच्या निविदा तसेच इतर निविदा विषयक कामकाज व ठेकेदारांची बिले अदा करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. ऐन उन्हाळ्यात पालिकेचे जलतरण तलाव सुस्थितीत कार्यान्वीत नसल्यामुळे त्यांच्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या विभागाकडून तक्रारींचे निवारण होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यावर आयुक्तांच्या दालणात बैठक घेऊन विचारणा केली होती.

 

दरम्यान, ठेकेदारांची बिले जुलै 2017 पासून प्रलिंबत ठेवणे, ठेकेदारास जुने एफडीआर परत न करणे, नवीन एफडीआर न घेणे, करारनामा करण्यास विलंब करणे, बीले वेळेवर अदा न करणे आदी तक्रारी समोर आल्या आहेत. शासकीय कर्तव्य किंवा शासकीय काम पार पाडण्यास जाणुनबुजून किंवा हेतुपुरस्सर विलंब लावणे किंवा दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागपुरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button