breaking-newsपुणे

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन

पिंपरी- पिंपरी-चिंचवडमधील विविध भागात क्रांतीसूर्य महात्मा ज्येतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गांधीनगर येथील सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या शेजारील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, गटनेते सचिन चिखले, कैलास बारणे, नगरसेविका अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पिंपरीतील फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संदिपान झोंबाडे, समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, उपाध्यक्ष मोहन वाघमारे, प्रसिध्दीप्रमुख विशाल कसबे, श्रावण बगाडे, सुधाकर वावरे, बाबुराव शिंदे, धुराजी शिंदे, संतोष कसबे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button