breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

कोहलीला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार

नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सीएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर कोहलीने तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. यापूर्वी कोहलीने 2011-12 आणि 2013-14 मध्येही हा पुरस्कार पटकावला होता.

भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनीयर यांना सीएट क्रिकेट रेटिंग्जच्या पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सीएटचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते इंजिनीयर यांना गौरवण्यात आले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने हा पुरस्कार स्वीकारला. शिखर धवनला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज, तर न्यूझीलंडच्या ट्रेण्ट बोल्टला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराचा मान देण्यात आला. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशिद खानला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधल्या सर्वोत्तम गोलंदाजांचा किताब देण्यात आला. तर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला ‘पॉप्युलर चॉईल अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला. न्यूझीलंडचा कोलिन मुनरो सर्वोत्तम टी 20 फलंदाज ठरला. तर भारताच्या अंडर 19 संघाचा क्रिकेटपटू शुभमान गिलला सर्वोत्तम अंडर 19 खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button