breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोविड 19 : शिवसेनेकडून महावितरण पिंपरी कार्यालयाला पाच स्प्रे-पंप, थर्मामीटर आणि सॅनिटायझर भेट

  • शिवसेनेचे संतोष सौंदणकर आणि अनंत को-हाळे यांचा पुढाकार
  • जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांची उपस्थिती

पिंपरी |महाईन्यूज| प्रतिनिधी

कोविड 19 विषाणुमुळे पिंपरी-चिंचवड शहरात गंभीर वातावरण बनले आहे. अशात महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयात आणि त्याअंतर्गत येणा-या पिंपरी ए, सांगवी, खराळवाडी आणि चिंचवड उपविभागीय कार्यालयांमध्ये विद्युत विषयक समस्या घेऊन येणा-या नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच, विद्युत कर्मचा-यांना सुध्दा ये-जा करावे लागते. कार्यालयात येणा-या प्रत्येकाचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर आणि विभागीय कार्यालयासह सर्व उपविभागीय कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सॅनिटाझर आणि पाच लीटर स्प्रे-पंप देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड हे 25 लाखांहून अधिक लोकसंख्येचे शहर आहे. विशेषतः ही उद्योगनगरी असल्याने याठिकाणी असंख्य उद्योग चालतात. त्यामुळे अशा उद्योगांचा विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, याची जबाबदारी विद्युत कर्मचा-यांवर असते. कामानिमित्त कर्मचा-यांना विभागीय कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालयात ये-जा करावे लागते. तसेच, नागरिक देखील वीज बील भरणा करणे, बिलासंदर्भात तक्रारींचे निराकरण करणे, नवीन विद्युत जोड घेणे, विज पुरवठा खंडीत होणे अथवा तांत्रीक अडचणी सोडविण्यासाठी विभागीय कार्यालयात किंवा संबंधीत उपविभागीय कार्यालयात ये-जा करत असतात. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यालयात येणा-या प्रत्येकाचे तापमान मोजण्यासाठी, कार्यालयाचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे यांच्या वतीने पाच लीटर स्प्रे-पंप, सॅनिटायझर आणि थर्मामीटर गन भेट देण्यात आल्या.

 शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, यांच्या हस्ते हे साहित्य महावितरण पिंपरी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांच्याकडे सपूर्द करण्यात आले. गटनेते कलाटे यांनी कार्यालयातील अधिका-यांना कोरोनाचे गांभीर्य उलघडून सांगितले. कार्यालयात येणा-या प्रत्येक नागरिकाची तसेच आपल्या कर्मचा-यांचे दररोज तापमान तपासण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना केल्या. सर्वांच्या सुरक्षेसाठी हे साहित्य अधिक उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाप्रमुख चिंचवडे यांनी देखील नागरिकच नव्हे तर एखादा बाधित रुग्ण अढळल्यास संपूर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. तसेच, उपविभागीय कार्यालय प्रमुखांना देखील तशा सूचना देण्यात याव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले. युवा सेना अधिकारी माऊली जगताप, पीटर, सुनिल पवार, रजनीकांत कदम, ओम परदेशी आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button