breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

कोल्हापुर –  हातकणंगले तालुक्यातील हेर्ले  येथे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास घडली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिता रवींद्र काटकर असे मृत महिलेचे नाव असून काटकर कुटुंबीय घरात झोपले असताना मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली.

हेर्ले येथील सिद्धेश्वर नगर परिसरात काटकर कुटुंबीय राहतात. रविवारी रात्री काटकर कुटुंबीय घरात झोपले होते. पावसामुळे घराच्या भिंतीला ओल पकडली होती. त्यातच पहाटेच्या सुमारास ही भिंत कोसळली. यावेळी काटकर कुटुंबीय झोपलेले होते. अनिता काटकर (वय ३२), पती रवींद्र काटकर (वय ३८), मुलगा चेतन काटकर आणि मुलगी शिवानी काटकर यांच्या अंगावर ही भिंत कोसळली. त्यावेळी रवींद्र काटकर यांनी घाबरून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन काटकर कुटुंबीयांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. यात रवींद्र काटकर आणि त्यांची दोन्ही मुले जखमी झाले. तर अनिता काटकर यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मृत अनिता या हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील समर्थ फौंड्री येथे कामाला होत्या. तर पती रवींद्र हे रिक्षा चालक आहेत. काटकर यांनी सुमारे ८ ते १० वर्षांपूर्वीच हे घर बांधले होते.कोल्हापूर जिल्ह्याला काही दिवसापासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. दुर्दैवाने पावसामुळे आज पहाटे याची भिंत कोसळली. अनिता यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button