breaking-newsमहाराष्ट्र

कोल्हापूरचा मावळा युथ ऑलिम्पिकमध्ये चमकला, शाहु मानेला नेमबाजीत रौप्यपदक

कोल्हापूरकर १६ वर्षीय शाहू माने याने भारताला युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या पदकामुळे अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स येथे रविवारपासून सुरू झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आपलं पदकांचं खातं खोललं आहे. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात शाहुने रौप्य पदकाची कमाई केली.

View image on TwitterView image on Twitter

क्रीडाजगत@kridajagat

कोल्हापूरकर १६ वर्षीय शाहू तुषार माने ने भारताला मिळवून दिले युवा ऑलिंपिक स्पर्धेतील पहिले पदक 🇮🇳🏅
नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात शाहू तुषार माने ने पटकावले रौप्यपदक आणि भारताला युवा ऑलिंपिक स्पर्धेत सुंदर सुरूवात करून दिली 👏👏

अंतिम सामन्यात अवघ्या 1.7 गुणांनी शाहुचं सुवर्ण पदक हुकलं. अंतिम सामन्यात त्याने एकूण 247.5 गुण मिळवले. तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव याने 249.2 गुण मिळवून सुवर्ष पदक पटकावलं, आणि सर्बियाच्या अलेस्का मिट्रोविक याने 227.9 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं. शाहु माने हा एकमेव भारतीय नेमबाज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरला होता. पात्रता सामन्यांमध्ये त्याने शानदार प्रदर्शन करताना एकूण 623.7 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button