breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
कोल्हापुरात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण
कोल्हापूर । प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने उभारलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्याचा वैचारिक पाया मजबूत करण्याचे कार्य केले. राज्य हे लोकाभिमुख असावे, सत्ता विकेंद्रित असावी अशी भूमिका चव्हाण साहेबांनी मांडली. त्यामुळे व्यापक आणि दृढ स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात अस्तित्वात आली.
कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या वतीने उभारलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण मा. खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यास उपस्थित राहिलो. @PawarSpeaks pic.twitter.com/5AB7Fl4WYG
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 22, 2021