breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात कोरोना सेंटरमध्ये गणरायाचे आगमन, मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते प्रतिष्ठापना

कोल्हापूर | कोल्हापूरच्या कागल येथील कोविड सेंटरमध्ये आज (22 ऑगस्ट) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीची प्रतिष्ठापना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्ह्यात नवीन शंभर बेडचे नवे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटनही हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

“कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना हे राज्यातील पहिलेच उदाहरण असावे असा दावा यावेळी मुश्रीफ यांनी केला. त्यासोबतच विघ्नहर्त्याकडे त्यांनी कोरोनाचे संकट लवकर दूर कर”, अशी प्रार्थनाही केली.

राज्यात आज अनेकांच्या घरी उत्साहात गणरायाचे आगमन झाले आहे. सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये त्यामुळे यंदा अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यासोबत गणेशाचे विसर्जनही कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button