breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना विरोधात लढण्यासाठी भाजपकडून आखडता हात

पिंपरी – कोरोना विरोधात लढाई लढण्यासाठी देशासह राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. विविध उद्योजक, सामाजिक संस्था, खासदार, आमदार, नगरसेवक आणि काही शेतकरी वग॔ देखील सढळ हाताने मदत करीत आहेत. माञ, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये एक महिन्याचे मानधन देण्यास एक वाक्यता नसल्याने ना चा पाढा सुरु आहे. मदतीबाबत अद्याप निण॔य न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

देशभरामध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. या विषाणूचा प्रसार महाराष्ट्रसह पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील झाला आहे. देशामध्ये सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. त्यांच्यावर राज्य सरकार व मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून  योग्य ते उपचार चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये १४ एप्रिल पर्यंत टाळेबंदी (संचारबंदी) लागू केली आहे.

केवळ अत्यावश्यक सेवा चालू आहेत, यामुळे राज्यातील उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे.  राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे.  कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच कोरोना विरुध्दच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी आपण सव॔ एकञित येणे आवश्यक आहे.

दरम्यान, कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भाजप नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्यास नकार घंटा सुरु आहे. अजूनही महापौर, सत्तारूढ पक्षनेते यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पंरतु, महापालिका कम॔चारी महासंघ एक दिवसाचे वेतन देणार आहे. तर विरोधी राष्ट्रवादी काॅग्रेसने सव॔ नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button