breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

कोरोना लस विक्री आधी भारतात नंतर जगभरात, जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसीचं लक्ष्य – आदर पुनावाला

पुणे / महाईन्यूज

कोरोना लस निर्मितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. सुमारे 1 तास सीरममधील संशोधकांशी चर्चा मोदींनी माहिती घेतली. त्यानंतर सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या या भेटीविषयी माहिती दिली.

आदर पुनावाला म्हणाले, “जगभरातील एकूण लसींपैकी 50-60 टक्के लसी भारतात बनवल्या जातात. याशिवाय आता आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली. यावर त्यांच्याशी सखोल चर्चा झाली.”

“आम्ही पंतप्रधान मोदींसोबत लस वितरणाबाबत चर्चा केली. मात्र, हे वितरण आपत्कालीन वितरणाची मंजूरी मिळाल्यानंतरच शक्य होणार आहे. यासाठी आम्ही योग्य आकडेवारी आणि माहिती संबंधित विभागाकडे जमा करत आहोत. त्यांनी याची तपासणी केल्यानंतरच ही मंजूरी मिळेल. अंतिम निर्णय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चेनंतरच होईल,” असंही पुनावाला यांनी सांगितलं.

“विविध कोरोना लस तयार होत आहेत. पंतप्रधान मोदींनी आजच्या भेटीत सीरमच्या लसीची माहिती घेतली. सध्या भारत सरकार किती लस खरेदी करणार हे मात्र अद्याप निश्चित झालेलं नाही. आम्ही पुढील 2 आठवड्यात आपत्कालीन परवान्यासाठी देखील अर्ज करणार आहोत. आम्ही सर्वात आधी भारतात कोरोना लस वितरण करु, नंतर जगभरातील कोव्हॅक्स देशांमध्ये वितरण होईल.” असे पुनावाला यांनी सांगितले

आदर पुनावाला यांनी यावेळी भारतात कोरोना लस साठवण्यासाठीच्या सुविधांवरही भाष्य केलं. ते म्हणाले ,”भारतात 1 किंवा 2 डिग्री सेल्सीयस तापमानावर साठवण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, उणे 20 डिग्री सेल्सीअस तापमानासाठी मात्र आपल्याकडे कमी सुविधा आहेत.”

“ही एक उत्तम लस असून ही लस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. तसेच ही लस रुग्णाच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या 60 टक्के विषाणूंना रोखते,” लसीच्या किंतीवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा झाली नाही, असंही ते म्हणाले.

आदर पुनावाला यांचे महत्वाचे मुद्दे

  • पंतप्रधान मोदींना लसीसंबंधिची खूप माहिती
  • मोदी विविध लसींबद्दल भरभरून बोलले
  • लसीकरणाच्या वितरणाचा प्लॅन तयार
  • युरोपियन देशही अॅस्ट्रा झेनेकोवर लक्ष ठेऊन
  • कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी 2 आठवड्यात परवान्यासाठी अर्ज करणार
  • लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात
  • आरोग्य मंत्रालयाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल – लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार
  • जुलै 2021 पर्यंत ३० कोटी लसींचे उद्दिष्टं
  • आशिया खंडातील देशांना लस पुरवणार
  • लसीच्या किंमतीवर चर्चा झाली नाही
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button