breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना रुग्ण अन्‌ त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार द्या : आमदार महेश लांडगे

पुणे । पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाउन केले आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना झालेल्या रुग्णाला व त्याच्या कुटुंबाला या काळात मोठ्या मानसिक आधाराची गरज आहे. तो आधार त्या कुटुंबाला द्यावा, असे आवहन पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष  व भोसरी विधानसेभेचे आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात उद्या (दि.१४) पासून सुरू होत असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे शहरवासियांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आपण सुज्ञ नागरिक आहात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहिर केलेले लॉकडाऊन पाळणे गरज आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने शुभेच्छांमुळे व डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे मी व माझे कुटुंबिय या आजारातून बरे होवून सुखरुपपणे बाहेर पडलो आहोत.कोरोना झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असतात, परंतू या प्रसंगात या रुग्णाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या मानसिक आधाराची आवश्यकता असते. मी आजारी पडल्यानंतर माझे मित्र, सहकारी नातलग यांनी सोशल मिडीयावर, फोनवरुन मला व माझ्या कुटुंबियांना दादा तुम्ही बरे व्हाल व सुखरुपपणे बाहेर पडाल अशा शुभेच्छा दिल्या. या मानसिक आधाराचीच या काळात खूप गरज असते.कोरोना रुग्णाला भेेटूनच त्याला आधार देण्याची आवश्यकता नाही. आपण फोन करुन तो आधार देवू शकतो. ज्या भयानक स्थितीतून हे कुटुंब जात असते, त्यावेळी त्याला घाबरू नका. तुम्ही या संकटातून बाहेर याल ही ताकद देणे व त्याचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. तुमच्या शुभेच्छाच माझ्या परिवाराला ताकद देत होत्या तशाच त्या इतरही कोरोना रुग्णांना दिल्या पाहिजेत.

उद्यापासून शहरात पुन्हा लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा असे आवाहन करत महेश लांडगे म्हणाले की, सगळ्या गोष्टी मनापासून सांभाळल्या पाहिजेत. जनता कर्फ्यु सारखे पालन करणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लॉकडाऊनमुळेच आपण ही साखळी तोडू शकतो.यावेळी आमदार महेश लांडगे यांनी प्रशासन, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कौतुकास्पद योगदान देत असल्याचे सांगून म्हणाले की, त्यांच्या योगदानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द आपूरे आहेत. आपले शहर हे सर्व जातीयधर्मीयांचे शहर आहे. देशभरातून येथे लोक आपल्या व आपल्या परिवाराच्या भविष्यासाठी येथे आले आहेत. आपल्याला या सर्वांचे स्वप्न साकार करावयाचे आहे. मला खात्री आहे आपण काटेकारेपणे लॉकडाऊन पाळाल. आपण सर्वजण मिळून हे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी कटीबद्ध राहू या असे आवाहन महेश लांडगे यांनीे केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button