breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोना रुग्णांकडून दुप्पट बिल आकारत असलेल्या रुग्णालयांना मुंबई महापालिकेचा चांगलाच दणका

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या थोड्याफार प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र, सध्या जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्याकडून दुप्पट बिल आकारले जात असल्याचं समोर आलं होतं. आता या रुग्णालयांना मुंबई महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे.

तक्रारदार रुग्णांना तब्बल १ कोटी ४७ लाखांची रुग्णालयाकडून परतफेड करण्यात आलीये. दामदुप्पट बिल आकरण्याबाबत तक्रारींचा छडा लावण्यासाठी लेखापरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती. एकूण १,११५ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ६२५ तक्रारी या ३७ रुग्णालयांतील होत्या.

या सर्व प्रकरणातील मूळ रक्कम १४ कोटी १ लाख इतकी होती. तक्रारींची पडताळणी केल्यावर देयकांची रक्कम १२ कोटीन५४ लाख इतकी असल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई महानगपालिकेने काही खासगी रुग्णालयांमधील ८०% खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्यात. या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून कोणत्या दराने शुल्क आकारणी करावी, याबाबत सरकारने दिलेल्या निर्देशांपेक्षा अधिक दराने खासगी रुग्णालये आकारणी करीत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. यानुसार मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली होती.

एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय पालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयासाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे किंवा पालिकेच्या १९१६ हेल्पलाइनवर तक्रार नोंदवून घेण्यात येते.दरम्यान पालिकेनं केलेल्या कारवाईमुळे रुग्णांना तसंच त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button