breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी, शहरात “पान टपरी-दुकाने बंद” करा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक “पान टपरी” समोर गोवा, गुटखा, सिगारेट, पान या अनेकांचे सेवन केले जाते. त्यामुळे त्याच ठिकाणी अधिकचे धुम्रपान होते. गोवा, गुटखा व पान खाल्ल्यानंतर लोक सर्वत्र ठिकाणी थुंकतात. त्यामुळे तेथे रस्त्यावर थुंकणा-यावर कारवाई करावी, तसेच सदरील दुकाने देखील बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसने केले आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले. त्यात म्हटले की, “कोरोना व्हायरस” हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जर कोणी बाधित असेल किंवा कोणाला काही आजार असेल तर, यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. धुम्रपान करण्याचे प्रमाणही शहरात जास्त प्रमाणात आहे. काही ठिकाणी तर अधिकृत स्मोकिंग झोनचं आहेत. त्यामुळे त्यातूनही येणाऱ्या धुराद्वारे जो धुम्रपान करत नाही, त्या सामान्य माणसाला देखील संसर्ग होऊ शकतो.  

कोरोना व्हायरसमुळे आपल्या शहरात गेल्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे. त्यात रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड शहरात चित्रपट गृहे, उद्याने, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स त्याचबरोबर शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत.

त्याच धर्तीवर शहरातील पान टपऱ्याही काही दिवस बंद करण्यात याव्यात, कारण, शहरात काही नामांकित अशा पान टपऱ्या आहेत. तसेच एस.टी स्टॅन्ड, कॉलेज याठिकाणी जवळपास ५० – ५० लोकं येऊन गर्दी करतात, त्यामुळे त्याठिकाणी जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून अन्न पुरवठा विभागातर्फे विशेष पथक नेमणूक करुन तशी यंत्रणा राबवावी. जे पान टपरी धारक “पान टपरी बंद” करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, नगरसेविका ‍निकिता कदम, नगरसेविका सुमन पवळे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button