breaking-newsमुंबई

कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज बैठक

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१८ ऑगस्ट) एक महत्वाची बैठक बोलावले आहे. या बैठकीत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची ही बैठक होणार आहे. १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याच्या शक्यता आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढवा घेतला जाणार आहे.

तसेच, दुरदृष्टी प्रणाली कशी आखता येईल आणि कोविड संदर्भात काय आणखी करता येईल यासाठी ही बैठक बोलवली आहे. यांत मंदिरे, तसेच जिम सुरु करण्याबाबत देखील चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. जिम व्यावसायीक आणि पुजारी पुन्हा एकदा मंदिरे आणि जिम सुरु करण्याच्या मागण्या करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button