breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

कोरोनासंबंधीत पालिकेच्या उपाययोजनांवर आधारित तीन चित्रफितींचे महापौरांच्या हस्ते प्रकाशन

पिंपरी- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका करित असलेल्या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या तीन चित्रफितींचे प्रकाशन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसदस्य एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, सुनिल आलमेलकर, बाळासाहेब खांडेकर, संदीप खोत, चित्रफितीचे निर्माते देवदत्त कशाळीकर, डॉ. गिरीश रांगणेकर आदी उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या संकल्पनेनुसार तयार करण्यात आलेल्या या तीन चित्रफितींमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर करण्यात येत असलेले उपचार, रुग्णांची घेण्यात येणारी काळजी तसेच रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स व नर्सेस, पूर्णपणे बरे झालेले रुग्ण, त्यांचे अनुभव इ.चे चित्रीकरण करण्यात आले आहे. दुस-या चित्रफितीध्ये कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची घेण्यात येणारी काळजी व तेथील कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तर तिस – या चित्रफितीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वॉररूम मधून सर्व यंत्रणेवर ठेवण्यात येणार नियंत्रण, तेथील कामकाज, माहिती संकलन याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button