breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कोरोनामुळे मराठी कलाकारांचं देखील होळीचं Celebration रद्द

कोरोनामुळे खबरदारी म्हणून अनेक मोठमोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून एकत्र जमण्यास मनाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खबरदारी म्हणून होळीचा कार्यक्रम रद्द केला आहे.  याच पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी देखील होळीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. 

मराठी मनोरंजन विश्वात रंगपंचमी मोठ्या उत्साहात खेळली जाते. अनेक सिने- चित्रपटसृष्टीतील  कलाकार खास होळीसाठी इथे जमतात. रंग खेळण्याचा मनमुराद आनंद लुटतात मात्र आता रंगपंचमीचा सण साजरा न करण्याचा निर्णय मराठी कलाकारांनी घेतला आहे. त्यामुळे हिंदी बरोबरच मराठी मनोरंजन विश्वात खेळला जाणारा रंगपंचमीचा सण यंदा खेळला जाणार नाही.  

कोरोना विषाणूच्या फैलावाने जगातील अनेक देश सध्या चिंतेत आहेत. चीनमध्ये या विषाणूने मोठ्या प्रमाणात हानी केली. आता त्यानं  भारतातही पाय रोवले आहेत. भारतामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या गुरुवारी सकाळपर्यंत २९ वर पोहोचली होती. या सर्वांवर विशेष कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर पुणे, मुंबईतील महापालिका रुग्णालयामध्ये  कोरोना तपासणीसाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button