breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

कोरोनामुळे डिसेंबर 2020 पर्यंत शाळा बंंदच राहणार असल्याच्या बातमीवर सरकारचं शिक्कामोर्तब नाही.

एकीकडे कोरोना पसरत असताना मागील काही काळात सोशल मीडियावर फेक न्युज सुद्धा तितक्याच वेगाने पसरत आहेत. केंद्र सरकारच्या नावाने अनेक बड्या वृत्तपत्रांंचे नाव घेऊन सोशल मीडियावर देशातील शाळा पुन्हा सुरु होण्याच्या बाबत बातम्या दाखवल्या जात आहेत. कोरोनामुळे गंंभीर झालेली परिस्थिती पाहता डिसेंबर 2020 पर्यंत शाळा बंंदच राहणार असा दावा या या बातम्यांमध्ये केला जात आहे. मात्र मुळातच केंद्र सरकारकडुन याबाबत घोषणा किंबहुना चर्चा सुद्धा झालेली नाही त्यामुळे या वृत्तात काहीच तथ्य नसल्यांचं स्पष्ट होत आहे.

वास्तविक शाळा कॉलेज पुन्हा सुरु कधी होणार याविषयी आता सर्वांनाच प्रश्न आहेत, अशावेळी मोठ्या वृत्तपत्रांंच्या हवाल्याने माहिती समोर येत असल्याचे सांगणार्‍या या पोस्ट खर्‍या वाटणे शक्य आहे, मात्र तुम्हाला अधिकृत माहिती हवी असल्यास कोणत्याही न्युज च्या ऑफिशियल वेबसाईट तसेच सरकारी साईटस व अकाउंट तपासुन पाहत जा. अद्याप तरी शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरु करण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर 24 मार्च पासुन लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊन अंतर्गत शाळा कॉलेज बंंद करण्यात आले आहेत. जुलै पासुन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातुन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या 1 ते 14 सप्टेंबर पासून शाळा पुन्हा सुरु कराव्यात याबाबत केंद्र सरकाचा विचार सुरु आहे. लवकरच त्यावर निर्णय होऊ शकतो, मात्र अजुनही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे अफवांंना बळी न पडणच हिताचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button