breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाने घेतला 1496 जणांचा बळी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यास पालिका प्रशासन अपयशी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणुचा हाहाकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बाधित रुग्णांच्या मृत्युंची संख्या दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. आजपर्यंत 1 हजार 134 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीबाहेरील 362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वच रुग्णांलयांमधील कोविड 19 साठीचे बेड अपुरे पडत आहे. कारण, दिवसाला 1 हजारहून अधीक पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या नोंद होत आहे. आजपर्यंत शहरात 69 हजार 423 रुग्ण पॉझीटिव्ह सापडले आहेत. तर, लगतच्या परिसरातून शहरात आलेले पॉझीटिव्ह 1 हजार 153 रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यातील 54 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर, शहराबाहेरील 3 हजार 785 रुग्णांनी कोरोनाला हरवले. एकूण 58 हजार 817 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.

तर, या महाभयंकर विषाणुची बाधा होऊन आजपर्यंत एकूण 1 हजार 496 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरालगतच्या भागातून उपचार घेण्यासाठी शहरात आलेल्या 362 रुग्णांचा समावेश आहे. काल शनिवारी दिवसभरात 52 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील 25 तर, बाहेरील 27 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button