breaking-newsमहाराष्ट्र

कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने काल (गुरुवार) रात्री हादरला. मागील सात दिवसांपासून मुसळधार पावसाने गारठून गेलेला कोयनेच्या परिसरात काल रात्री ९.०७ वाजता ३.१ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पाटणच्या तहसिलदारांनी याला दुजोरा दिला आहे.

भूकंपाच्या धक्क्याचे अंतर कोयना धरणापासून २० किमी इतके होते. या धक्क्याने पाटण तालुक्यात कोणत्याही ठिकाणी जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी सांगितले. तर, कोयना धरणाला या भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button