breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कोण आहेत महाराष्ट्राचे नवे मुख्य आयएएस सचिव संजय कुमार?

मुंबई : आयएएस संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर संजय कुमार हे मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहात आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. संजयकुमार फेब्रुवारीमध्ये निवृत्त होणार आहेत.

मे 2019 मध्ये अजोय मेहता यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन थेट राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागली होती. अजोय मेहता यांना यापूर्वी मुदतवाढ मिळाली होती. मात्र, आता पुन्हा मुदतवाढ मिळालेली नाही. अजोय मेहता यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या रेसमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची नावं होती. मात्र संजय कुमार यांच्या नावाला पसंती मिळालेली आहे.

कोण आहेत संजय कुमार?

  • संजय कुमार  हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • ते मूळचे बिहारचे असून त्यांना प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव आहे
  • संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत.
  • संजय कुमार गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतात.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button