breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोकण फर्स्ट ‘ अभियानाची घोषणा

‘ग्लोबल कोकण, समृध्द कोकण ‘ चळवळीतर्फे आयोजन

पुणे | प्रतिनिधी

कोकणच्या सर्वांगीण विकासाचे उद्दीष्ट ठेऊन ‘ग्लोबल कोकण, समृध्द कोकण ‘ चळवळीतर्फे ‘ कोकण फर्स्ट ‘ अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. अभियानाचे प्रमुख संजय यादवराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘कुणीतरी कोकणचा विकास करेल, संकल्पना बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येऊन आपलीही देवभूमी जगात शाश्‍वत विकासासाठी ओळखली जाईल, अशा स्वरूपाचे समृद्धीचे मॉडेल विकसित करू. अनेक जागतिक व्यक्तिमत्वे कोकणातले आहेत. ही व्यक्तिमत्व सुद्धा कोकणाकडे भविष्यात लक्ष देतील, अशी अपेक्षा करू या. मात्र मीच आहे माझ्या कोकणचा ॲम्बेसेडर असा विचार करून नव्या वर्षात ‘ कोकण फर्स्ट ‘ही संकल्पना राबवण्याचा आपण संकल्प करूया, ‘ असे आवाहन संजय यादवराव यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धी पत्रकाद्वात नमूद केले आहे की, लंडन फर्स्ट या उपक्रमातून प्रेरणा घेऊन ही चळवळ सुरु करीत आहोत. लंडनमधील माणूस जगाच्या पाठीवर कुठे गेला तरी आपले लंडन किती सुंदर आहे, सुसंस्कृत आहे याची माहिती तो जगभर देतो. लंडन मध्ये निमंत्रित करतो. असेच यापुढे ग्लोबल कोकण, कोकण बिझनेस फोरमचे सर्व कार्यकर्ते आपल्या विजिटिंग कार्ड वर ‘कोकण फर्स्ट हा लोगो छापतील. संपूर्ण जगभर आणि देशभर जिथे जिथे जातील तिथे कोकणचे ॲम्बेसिडर बनुन आपल्या कोकणातील निसर्गसमृद्ध पर्यटन स्थळांची, आणि येथे असलेल्या सुविधांची, येथील संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृती यांची माहिती जगाला देतील, अशा स्वरूपाचे अभिनव अभियान नव वर्षात पहिल्या दिवसापासून सुरु करीत आहोत. समृद्ध कोकण चळवळींशी संबंधित असलेले सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांनी सहभागी होण्याचे आवाहन या वेळी आयोजकांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button