breaking-newsमनोरंजन

‘कॉमेडी किंग’ कपिलच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का ?

कलाविश्वामध्ये गेल्या वर्षभरापासून लग्नाचे वारे वाहत आहे. बॉलिवूडमधील दीपिका-रणवीर, निक-प्रियांका या प्रसिद्ध जोड्या विवाहबंधनात अडकल्यानंतर छोट्या पडद्यावरील विनोदवीर कपिल शर्मादेखील लवकरच बोहल्यावर चढणार आहे. कपिल लवकरच प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्न करणार असून त्याच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कपिल आणि गिन्नी  १२ डिसेंबर रोजी लग्न करणार आहे. कपिलच्या मूळगावी जालंधरजवळ असलेल्या फगवाडा येथे हा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  या आनंदाच्या प्रसंगी केवळ कपिल -गिन्नीच्या जवळचे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. नुकतीच कपिलने त्याची लग्नपत्रिका इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पत्रिका पाहता पाहता वाऱ्यासारखी व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.

लाल आणि गोल्डन असं कॉम्बिनेशन वापरुन ही पत्रिका तयार करण्यात आली आहे. या पत्रिकेवर कपिल आणि गिन्नी यांच्या इंग्रजी नावातील पहिलं अक्षर लिहीण्यात आलं आहे. कपिल -गिन्नीच्या लग्नसोहळ्याला १० डिसेंबरपासूनच सुरुवात होणार आहे. यावेळी हळद आणि मेहंदी हे सोहळे रंगणार आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षभरामध्ये कपिलच्या आयुष्यात अनेक चढउतार आल्याचं पाहायला मिळालं. त्याचा कॅमेडी शो अपयशी ठरला, त्यानंतर सहकाऱ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. इतकचं नाही तर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असताना त्याचा चित्रपट अयशस्वी ठरला. या आणि अशा अनेक वाईट अनुभवातून गेल्यानंतर कपिल पुन्हा एकदा जोमाने उभा राहिला आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ नव्या स्वरुपात सोनी वाहिनीवर सुरू होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button