breaking-newsराष्ट्रिय

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरू नयेत

कार्यकारणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी केली सुचना 
नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या नवीन कार्यकारणीच्या काल झालेल्या पहिल्याच बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष कायकर्ते आणि नेत्यांना बऱ्याच मौलिक सुचना करताना भाजप आणि संघापासूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे असे म्हटले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना कोणतेही अपशब्द वापरू नयेत तसेच सार्वजनिक महत्वाच्या विषयांवर पक्षाची लाईन सोडून वायफळ वक्तव्ये करू नयेत असा सल्ला दिला आहे.

संघ-भाजप कार्यकर्त्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे असे नमूद करताना ते म्हणाले की पुर्वी अदिवासी हा आपला हक्काचा मतदार होता. पण संघ आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यात जाऊन त्यांना आपलेसे केले आणि त्यांना कॉंग्रेस पासून तोडले. त्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. आता आपल्यालाही पुन्हा त्यांच्यात जाऊन त्यांचा पक्षावरील विश्‍वास पुन्हा प्राप्त करावा लागेल.

कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना असभ्यपणे बोलणे टाळणे जसे महत्वाचे आहे तसेच सार्वजनिक महत्वाच्या विषयावर बोलताना त्यांनी असंबद्ध बोलणेही टाळले पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनीही याच विषयावर पक्ष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सुचना करताना सांगितले की त्यांनी शिस्त पाळावी आणि अनावश्‍यक वक्तव्ये टाळावीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button