breaking-newsराष्ट्रिय

कॉंग्रेस आमदारच म्हणाले माझ्याविषयीची ऑडिओ क्‍लीप बोगस

बंगळुरू – कर्नाटकात कॉंग्रेसचे आमदार फोडण्यासाठी त्यांना कशाप्रकारची अमिषे दिली जात आहेत हे दाखवण्यासाठी कॉंग्रेसने दूरध्वनी संभाषणाच्या एकूण तीन ध्वनिफिती प्रकाशित केल्या आहेत. तथापी त्यातील आपल्या संबंधीत टेप बोगस आहे असे स्वता कॉंग्रेस आमदार शिवराम हेब्बर यांनी म्हटल्याने कॉंग्रेसला नामुष्कीजनक स्थितीला सामोरे जावे लागले आहे.

या टेप मध्ये, शिवराम हेब्बर यांच्या पत्नी आणि भाजप नेत्यांचे संभाषण आहे. त्यात भाजप नेत्यांनी हेब्बर यांच्या पत्नीला आपल्या पतीला रोख पैसे व कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद देण्याचे अमिष दिले आहे. तथापी शिवराम हेब्बर यांनी आज फेसबुक पोस्टवर आपल्याविषयीची ही टेप बोगस आहे असे म्हटले आहे. आपल्या पत्नीला अशा प्रकारचा कोणताही कॉल आलेला नव्हता असे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे. या टेप मधील महिलेचा आवाज हा आपल्या पत्नीचा आवाज नाही. या खोट्या क्‍लीपचा आपण निषेध करतो असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान त्यांच्या या दाव्यामुळे कॉंग्रेस पक्षाला मात्र नामुष्कीजनक स्थितीला सामोरे जावे लागले आहे. या क्‍लीप मध्ये येडियुरप्पांचे चिरंजीव बीवाय विजयेंद्र व त्यांचे एक निकटचे सहकारी बी जे पुट्टुस्वामी हे हेब्बर यांच्या पत्नीशी बोलत असल्याचे दिसते आहे. त्यात त्यांनी हेब्बर यांना पंधरा कोटी रूपये देण्याची ऑफर दिली. मंत्रिपद हवे असेल तर मात्र केवळ पाच कोटी रूपये आणि मंत्रिपद दिले जाईल असे हेब्बर यांच्या पत्नीला सांगण्यात आले आहे. हेब्बर यांच्या पत्नी व मुलावर बेकायदा खाणकामाचे गुन्हे दाखल आहेत तेही मागे घेण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आल्याचे या क्‍लीपमधून ऐकायला मिळाले आहे. पण स्वता हेब्बर यांनीच ही टेप बोगस असल्याचे म्हटले असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button