breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कॉंग्रेसने कामगारांना संरक्षण दिले तर, भाजपाने कामगारांना वा-यावर सोडले – मोहम्मद बद्रुजम्मा

असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या रोजगार मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी | प्रतिनिधी

देशातील कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक सक्षमता, कौटुंबिक प्रतिष्ठा आणि त्यांच्या श्रमाचा सन्मान ठेऊन त्यांना योग्य मोबदला देण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस पक्ष करीत आला आहे. प्रचलित कामगार कायद्यातून कॉंग्रेसने कामगारांना संरक्षण दिले होते. तर केंद्रातील भाजपा प्रणित मोदी सरकारने कामगारांना वा-यावर सोडले आहे, असे प्रतिपादन असंघटीत कामगार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्रुजम्मा यांनी चिंचवड येथे केले.

चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी सुंदर कांबळे, महाराष्ट्र अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक शिवाजीराव जगताप, असंघटीत कामगार कॉंग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल शिंदे, महिला शहराध्यक्षा शितल कोतवाल, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे, पुणे जिल्हा असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कामगार नेते सिताराम चव्हाण तसेच संदेश नवले आदी उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रातील २७ कंपन्यांतील प्रतिनिधींनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि निवड झालेल्या ४५० हून जास्त उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच शितल कोतवाल यांना घरेलू महिला कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.

प्रास्ताविक करताना सुंदर कांबळे म्हणाले की, लॉकडाऊनचा मोठा फटका पिंपरी चिंचवड या कामगार नगरीला बसला आहे. महानगरपालिकेने या काळात कामगारांना कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे लाखों कामगार आपल्या मुळ गावी गेले. शहरातील उद्योग चक्र पुन्हा वेगाने सुरु होण्यासाठी आता असंघटीत कामगार कॉंग्रेस लढा उभारणार आहे. लॉकडाऊन काळात सलग दोन महिने पिंपरीत असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने अन्नदान करण्यात आले अशी माहिती सुंदर कांबळे यांनी दिली.

सोशल मीडिया समन्वयक मोहन उनवणे, हातगाडी, टपरी, पथारी, समन्वयक अझहर पुणेकर, रिक्षा संघटनेचे समन्वयक दिलीप साळवे, लघुउद्योग समन्वयक विजू शिंदे, ड्रायव्हर संघटनेचे समन्वयक नवनाथ डेंगळे, माथाडी कामगार समन्वयक नितीन पटेकर, असंघटित कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर सचिव अतुल जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष हातगाडी, टपरी, पथारी  चांद बागवान, फातिमा शेख, अनिता रंधवे, वंदना आराख, हिना बागवान व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनात सहभाग घेतला.

स्वागत शितल कोतवाल, प्रास्ताविक सुंदर कांबळे, सुत्रसंचालन प्रा. किशोर मनवर आणि आभार अझहर पुणेकर यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button