breaking-newsपुणे

कॉंक्रीटीकरण चुकल्याने उभा खांब जमीनदोस्त

 

  • महामेट्रोवर पुणेकरांचा रोष : “नुकसानीला जबाबदार कोण’ नागरिकांकडून प्रतिक्रीया
    – प्रकल्प सुरक्षिततेसाठी बाब महत्त्वाची; मेट्रोचा खुलासा

पुणे – नदीपात्रात सुरू असलेल्या मेट्रोच्या खांबाचे कॉंक्रीटीकरणाचे काम चुकल्याने एक उभा असलेला सुमारे 45 फूटांचा खांब तोडण्याची वेळ महामेट्रोवर आली, गुरुवारी सकाळी हा फोडण्याचे काम ब्रेकरद्वारे सुरू करण्यात आले. त्यामुळे नदीपात्रातील नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. तसेच उभा असलेला खांब तोडला जात असल्याने हे पुणेकरांच्या पैशाचेच नुकसान असून याला जबाबदार कोण अशा प्रतिक्रीया या नागरिकांकडून कळविण्यात येत होत्या.

कामाबाबत साशंकता; खुलासा करण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी एका खांबाचे गज वाकल्याने त्यांना आधार देण्यात आला होता; तर आता चुकीच्या पध्दतीने शटरिंग झाल्याने खाबांचे काम चांगल्या दर्जाचे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कामाबाबत साशंकता निर्माण झाली असून महामेट्रोने त्याबाबत खुलासा करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्राद्वारे केली आहे.

वनाज ते रामवाडी या मार्गावरील वनाज ते धान्य गोदाम हे मेट्रोचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत नदीपात्रात सुमारे 1.7 किलोमीटरचा मार्ग असून त्यासाठी एकूण 59 खांब उभारले जाणार आहेत. त्यातील चार ते पाच खांबाचे काम हे दहा फुटांच्या वर गेले आहे. या खांबामधील 159 क्रमांकाच्या खांबाचे कॉक्रीटीकरणाचे काम 30 फुटांच्या वर सुरू असताना; जे कॉंक्रिट शटरिंगमध्ये भरण्यात येत होते ते बाहेर पडत होते. तसेच हे कॉक्रीट खालील बाजूच्या आधीच्या बांधकामाशी जोडले गेले नाही. ही बाब त्यावेळी उपस्थित असलेल्या महामेट्रोच्या अभियंत्याच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तातडीने हे कॉंक्रीटीकरणाचे काम थांबविले तसेच संपूर्ण खांबच जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या खांबाचा पाया चांगला असून तो काढण्यात येणार नाही. केवळ जमीनीवर असलेले खांबाचे कॉक्रीटकरण काढण्यात येणार असल्याचा खुलासा महामेट्रोकडून करण्यात आला आहे. मेट्रो मार्गाच्या सुरक्षिततेसाठी ही बाब महत्त्वाची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • पुणेकरांच्या रोषाचे कर्मचारी बळी
    हा खांब नदीपात्रातील रस्त्यालगतच आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज हजारो पुणेकर ये-जा करत असतात. गुरुवारी सकाळी ब्रेकरने हे खांब पाडण्याचे काम सुरू करण्यात आल्याने अनेक पुणेकरांनी त्याचे फोटो तसेच व्हिडीओ काढले आणि ते सोशल मिडीयावर टाकले तर अनेकांनी या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना बडबड करत, आमच्याच पैशाची उधळपट्टी करा असेही या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना सुनावले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button