breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळात संघ कार्यकर्त्याची हत्या

कन्नुर – केरळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार सुरूच असून त्यातूनच काल तेथे एका संघ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. रिक्षा चालक असलेले संघाचे कार्यकर्ते शेमज यांची काल रात्री हत्या करण्यात आली. पल्लूर येथील एका मार्क्‍सवादी नेत्यावर संघ कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचे सांगितले जाते.

कन्नुर आणि कोझीकोडे या जिल्ह्यांच्या मध्यभागी असलेल्या न्यु माहे या गावात हा प्रकार घडला. राजकीय वैमनस्यातून बाबू नावाच्या मार्क्‍सवादी पक्षाच्या एका स्थानिक नेत्यावर हल्ला झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याने त्या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या हत्येच्या आणि हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने कन्नुर जिल्हा तसेच माहे गावात हरताळ पाळण्याचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी तेथे चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button