breaking-newsराष्ट्रिय

केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू

तिरुवअंनतपुरुम : देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह विषाणू जलद गतीने पसरत आहे. या विषाणूमुळे येथील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 25 जणांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये निपाह विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता केरळ सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. केरळ सरकारच्या मागणीची गांभीर्यानं दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डानं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)चं पथक केरळमध्ये पाठवण्याचे आदेश दिलेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. यामुळे या विषाणूला ‘निपाह’ असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. 2004मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button