breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळच्या 8 पर्यटकांचा नेपाळच्या एका हॉटेलमध्ये मृत्यू, गॅस लीक होऊन मृत्यू

केरळ | महाईन्यूज

8 भारतीय पर्यटकांचे मृतदेह आढळले. हॉटेलच्या रुममध्ये गॅस लीक झाला आणि त्यामुळे श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आलेला आहे. हे सर्व पर्यटक केरळचे होते. परराष्ट्र राज्य मंत्री वी मुरलीधरन यांनी सांगितले की, या सर्वांचे मृतदेह काठमांडूवरुन तिरुअनंतपुरमला आणले जात आहेत.

तिरुअनंतपुरमचे रहिवासी रंजीत आणि प्रवीण त्या दोघांच्या पत्नी आणि चार मुले हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नेपाळ पोलिसांनी सांगितले की, 15 जणांची टीम केरळवरुन नेपाळला आली होती, परत येताना हे लोक एव्हरेस्ट पैनोरमा रिजॉर्टमध्ये थांबले होते. येथे एका रुममध्ये गॅस लीक होऊन त्यांचा मृत्यू झाला.

  • एका रुममध्ये थांबले होते 8 पर्यटक, दार-खिडक्या बंद होत्या

मॅनेजरने सांगितल्यानुसार, सर्वजण सोमवारी रात्री 9:30 वाजता रिजॉर्टमध्ये थांबले होते. रुमला गरम ठेवण्यासाठी त्यांनी गॅस हीटर ऑन केलेले होते. यावेळी एका रुममध्ये 8 जण थांबले होते. या रुमचे सर्व दार-खिडक्या बंद होत्या. यावेळी त्या हीटरमधील खराब गॅस कार्बन मोनोआक्साइड रुममध्ये पसरली आणि त्यामुळेच या आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button