breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केजरीवालांची संपत्ती किती? पहा पाच वर्षांत झाली इतकी वाढ

दिल्ली | महाईन्यूज

‘अच्छे बीते पाच साल, लगे रहो केजरीवाल’ या घोषवाक्यासह आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मंगळवारी तब्बल सहा तास रांगेत उभा राहून केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केजरीवाल यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. यामध्ये केजरीवालांनी आपल्याकडे ३.४० कोटींची संपत्ती असल्याचा उल्लेख केलेला आहे.

केजरीवाल यांनी मंगळवारी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात तब्बल ६५ जण मैदानात उतरलेले आहेत. यापैकी बहुतांश अपक्ष उमेदवार आहेत. भाजपकडून सुनील यादव, तर काँग्रेसकडून रोमेश सभरवाल निवडणूक लढवणार आहेत. पाच वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या केजरीवाल यांच्या संपत्तीत जवळजवळ दीड कोटींनी वाढ झालेली आहे. २०१५ मध्ये केजरीवाल यांनी आपली संपत्ती २.१० कोटी असल्याचे नमूद केलं होतं. २०२० मध्ये त्यांची संपत्ती तीन कोटी ४० लाख झाली आहे. अरविंद केजरीवालांकडे ९ लाख ६५ हजार रूपयांची रोकड आणि मुदत ठेवी आहे. केजरीवालांच्या स्थावर मालमत्तेत कोणतीही वाढ झाली नसल्याचे दिसतेय. २०१५ आणि २०२० मध्ये त्यांची स्थावर मालमत्ता एक कोटी ९२ लाख रूपये आहे.

केजरीवाल यांची संपत्ती 2015 2020
वार्षिक संपत्ती 2,07,330 रुपये 2,81,375 रुपये
चल संपत्ती 2,26,005 रुपये 9,95,741 रुपये
अचल संपत्ती 92,00,000 रुपये 1,77,00,000 रुपये
वाहन — —
गुन्हे/खटले 7 13

केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांच्याकडे २०१५ मध्ये १५ लाख रूपयांची रोकड संपत्ती होती. २०२० मध्ये त्यांची संपत्ती ५७ लाख रूपये झालेली आहे. पक्षाच्या एका आधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मिसेस केजरीवालांनी सरकारी नोकरीतून व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांना ३२ लाख रुपये मिळालेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button