breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरी यांनी तोडगा काढावा – नितिन राऊत

नागपुर – दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलीय. नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रमाला ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,03,40,470 वर

ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी गडकरी यांच्याकडे एक मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी गडकरींकडे केली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी. केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरी यांनी तोडगा काढावा, अशी मागणीच त्यांनी गडकरींकडे केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंदर्भात शेतकरी आणि सरकारच्या अनेक बैठका झाल्या, परंतु अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. आता नितीन राऊत यांनी थेट नितीन गडकरींकडे यावर तोडगा काढण्याची इच्छा प्रकट केली आहे.

तर मागणी काही दिवसांपूर्वीही नितीन गडकरींनीही शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती. ‘केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत. आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांनी पुढे येऊन कृषी कायदे समजून घ्यायला हवे’, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button