breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर फॉल्टी’; आमदार रोहित पवारांचा भाजपावर आरोप

अहमदनगर | भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला मदत म्हणून दिलेले व्हेंटिलेटर हे फॉल्टी असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे ते अहमदनगर मध्ये बोलत होते. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मात्र शिक्षणमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या गाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १ कोटी ३७ लाख रुपये मंजूर केले आहेत. जनतेचे सेवक असल्याचा दावा करत सत्ता स्थापन करणार्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांवर उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने राज्यातील ठाकरे सरकारवर केला होता

त्यावर स्पष्टीकरण देताना आमदार रोहित पवार यांनी थेट केंद्र सरकारवरच निशाणा साधला आहे. ‘संपूर्ण गाड्याचा खर्च हा ५० लाख ते १ कोटी पर्यंत असेल मात्र हा काही राज्याचा किंवा देशाचा मुद्दा नाही. मात्र अशा परिस्थितीत देखील भाजपा राजकारण करत असेल तर मागच्या पाच वर्षात त्यांनी काय-काय केले हे सगळ्यांनी बाहेर काढले आहे आणि आम्ही देखील ते बाहेर काढू शकतो.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button